Jereys जेरीस

Hello Friends,

Please find this new Blog titled ‘Jereys जेरीस’ The blog will be in English and Marathi. Will try for a weekly posting. 

For a long time I had this desire to create my own blog, but did not know how to. Then as usual our tech-savvy daughter Piyusha came to the rescue. She created something in 90 minutes which would have taken me – no it wouldn’t have taken me much time – I would have just surrendered to a professional. God knows how much the professional would have charged – talking of money, I don’t know if Piyusha has given me a free service, but at least with her I can negotiate. 

This is an attempt to write something which we all think or feel but do not express in words. Sometimes we don’t look at the things this way. Sometimes we don’t know we’re looking at it but don’t acknowledge. Also as the Title suggests – it’s a wordplay on three fronts, if I may. One, it’s just twisting of our family name, two, it’s trying to find the Jerry in you, and three, in Marathi जेरीस आणणे means pester someone till that person gets exhausted. 

Well let’s see, or rather you’ll see what I have done – because it’s only the sages who can see oneself. Mind you, no Artificial Intelligence is used here, except whatever is stuffed in my brain over the years by parents, teachers, family, friends, relatives, writers, poets, musicians, actors, directors, unknown people, events, places, and some imagination – let’s call this natural. 

Please comment if you like, what you like, please definitely comment if you don’t like and please definitely-definitely comment if you think some changes may be wise. 

Hemant Jere 14/09/2026

मित्रानो आणि मैत्रिणींनो 

जे माझे मित्र नाहीयेत [असे त्यांना वाटते] ते सोडून बाकी सर्व माझे मित्रच आहेत. आणि ६ वर्षांच्या ईराया पासून ८४ वर्षांच्या तिच्या पणजी पर्यंत सर्व जणी माझ्या मैत्रिणी आहेत. 

तर या प्रचंड मोठ्या ऑडियन्स पैकी ज्यांना वाचण्याची दुर्बुद्धी होते, त्यांच्या करता हा ब्लॉग आहे. 

फार पूर्वीपासून असला काहीतरी उपद्व्याप करायची इच्छा होती. अशा आपल्या खूप इच्छा असतात पण आपल्या पिढीजात आळशीपणामुळे त्या तिथेच राहतात, पण इथे प्राजक्ता मानगुटीवर बसली आणि पियुषाने तर फक्त दीड तासात त्यातल्या technical गोष्टीचा फडशा पाडला. हे पाहिल्यावर ही माझीच मुलगी आहे ना अशी शंका आली, पण मग आठवलं, की ती प्राजक्ताची पण मुलगी आहे. आणि माझे दिव्य अक्षर वाचून शुद्ध टायपिंगचे काम माझ्या मोठ्या मुलीने, ऋतुजाने केले. 

माझ्या, तुमच्या मनात अनेक गोष्टी असतात, ज्या आपण शब्दात मांडण्याचा फारसा प्रयत्न करत नाही. कधी-कधी हे मनात आहे हे सुद्धा आपल्याला माहित नसते. कधी-कधी त्याच गोष्टीकडे जरा वेगळ्या चष्म्यातून पहिले तर जरा वेगळी मजा येते. नाहीतरी आता नेहमीचाच पदार्थ वेगळ्या पद्धतीने करायची फॅशन आहेच. साध्या चहाचे हे वेगवेगळे अवतार बघा – तंदूर चहा, गुळाचा चहा, बासुंदी चहा, अमृततुल्य चहा, ब्लॅक टी, maccha, bulleted टी,   चुलीवरचा चहा, इराण्याकडचा अफू घातलेला, टी बॅग्स चा ओतता ओतताच थंड पडलेला आणि गावाकडचा जीभ भाजणारा. तर असाच हा नेहमीच्या गोष्टीचा तंदूर.

या नावात थोडा शब्दच्छल करायचा प्रयत्न केला आहे. आमचे जेरे हे आडनाव, Tom and Jerry  मधला उपद्व्यापी जेरी  आणि ‘जेरीस आणणे’ हा वाक्प्रचार, याची ही मिसळ आहे. जाता जाता  – [आमच्याकडे ३ मांजरी आहेत. त्यातली सर्वात लहान मांजर दोन्ही मोठ्यांची खोडी काढते किंवा mess up करते, आणि मग मार खाते. तोच आमचा Jerry आहे.]

बरे हे लिहिताना कुठे AI वापरला नाहीये. लहानपणापासून आतापर्यंत आई- अण्णा, वेगवेगळे शिक्षक, कुटुंब, मित्रमंडळी, नातेवाईक, लेखक, कवी, कलाकार, दिग्दर्शक, घटना, ठिकाणे, अनोळखी  व्यक्ती  आणि स्वतःची कल्पनाशक्ती यांनी इतक्या गोष्टी डोक्यात कोंबल्यात, आणि त्यालाच आपण नैसर्गिक बुद्धिमत्ता म्हणूया. 

हा उपद्व्याप आवडला तर नक्की कळवा, नाही आवडला तर नक्कीच कळवाल, आणि सूचना द्यायच्या असतील तर मग खात्रीच कि तुम्ही कळवणार. पण खरंच comment  करा, मला पण जरा वाचू  दे ना.   

हेमंत जेरे 

१४ septemeber २०२६, गणेश चतुर्थी 

25 responses to “Jereys जेरीस”

  1. Kalidas Bhangare Avatar
    Kalidas Bhangare

    Very nice Hemant ❤️

    1. hemantjere123@gmail.com Avatar

      Thanks a lot Kalidas. Hope you would like future blogs too.

  2. गोविंद बहिरट Avatar
    गोविंद बहिरट

    प्रिय मित्र हेमंत,
    तू खरेच खूप हुशार इंजीनिअर आहेस. तुझे इंग्रजी शब्दकोश वादातीत आहे, तसेच मराठी तर तुझी मातृभाषा, तेव्हा दोन्ही भाषेत टोलवाटोलवी तू तूफान करशीलच त्यात वादच नाही.
    तुझ्या या “जेरीस” आणणाऱ्या उपक्रमाला माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

    1. hemantjere123@gmail.com Avatar

      खूप धन्यवाद गोविंद. नक्की पुढेही हे ब्लॉग्स वाचत राहशील अशी खात्री आहे. तुझ्या इतर मित्रमैत्रिणीना पण कळव.

  3. नितिन गिजरे Avatar
    नितिन गिजरे

    हेमंत मित्रा
    खरोखरीच छान आणि सत्य परिस्थिती कथन केली आहेस. मनात खुप विचार असतात पण ते अशा रीतीने मांडणे हेच अवघड असते. परंतु आजच्या शुभदिनी तू प्रकटलास.ते अभिनंदनीयच आहे. लिहीत रहा.
    शुभेच्छा 🙏

    1. hemantjere123@gmail.com Avatar

      खूप धन्यवाद नितीन. नक्की पुढेही हे ब्लॉग्स वाचत राहशील अशी खात्री आहे. तुझ्या इतर मित्रमैत्रिणीना पण कळव.

  4. Milind Avatar
    Milind

    मस्तच रे मित्रा 👍👍👍👌👌👌👌

    1. hemantjere123@gmail.com Avatar

      खूप धन्यवाद मिलिंद . नक्की पुढेही हे ब्लॉग्स वाचत राहशील अशी खात्री आहे. तुझ्या इतर मित्रमैत्रिणीना पण कळव.

  5. राजेंद्र भार्गवे Avatar
    राजेंद्र भार्गवे

    मराठी लेखन , अत्यंत सुरेख व मनाला भावणारे.👍

    1. hemantjere123@gmail.com Avatar

      खूप धन्यवाद राजाभाऊ . नक्की पुढेही हे ब्लॉग्स वाचत राहशील अशी खात्री आहे. तुझ्या इतर मित्रमैत्रिणीना पण कळव.

  6. Hrishikesh Jere Avatar
    Hrishikesh Jere

    Fantastic keep it up and ikde pan pahilya kahi paragraph madhe hasha milavlay nahitar foul hota hota rahila. Will keep looking out for your weekly dose now

    1. hemantjere123@gmail.com Avatar

      Thanks a lot Rishi. Please inform your friends who still like to read.तुझ्या काकूला मी फार त्रास देऊ नये म्हणून तिचा याला पूर्ण पाठिंबा आहे.

  7. Dhananjay Chiplunkar Avatar
    Dhananjay Chiplunkar

    हेमंत ब्लॉगला Jereys नाव देण्याची आयडीया आवडली.

    आता तू काय आणि कधी पाठवतोस याची उत्सुकता आहे.
    शुभेच्छांसह,
    तुझा मित्र,
    धनंजय चिपळूणकर

    1. hemantjere123@gmail.com Avatar

      खूप धन्यवाद धनु . तुझ्या इतर कंमेंट्सची पण वाट पाहीन. इतर मित्रमैत्रिणीना पण कळव.

  8. Dharurkar Avatar
    Dharurkar

    My only comment is given on Sweekar group.That is without reading your blog first.
    As if a person should do new things when he feels like.You should not think what world will think.
    This is the first and foremost thing I like about you.You have just started.Congratulations 👍👍👍

    1. hemantjere123@gmail.com Avatar

      Dear Mukunda, thanks for your comments. Yes we get only one life. Let’s try and do as much as we’re able to.
      And this blog is just a small way. I have shared something which I had written 14 years back.
      But I fully rely for the real feedback on friends like you.

  9. सुचित्रा कुलकर्णी Avatar
    सुचित्रा कुलकर्णी

    हेमंत, मस्त रे ! खूप खूप शुभेच्छा ! तुझ्या सृजनशीलतेला असेच नवे आविष्कार सापडतील. अनुभवांच्या सखोलतेला प्रतिभेचा साज मिळाला की काही नवे, वेगळे स्वरूप मिळेल.

    1. hemantjere123@gmail.com Avatar

      खूप धन्यवाद सुचित्रा. तुझ्या इतर कंमेंट्सची पण वाट पाहीन. इतर मित्रमैत्रिणीना पण कळव.

  10. Meenakshi Wani Avatar
    Meenakshi Wani

    Khup sundar Shewate…
    Awaiting new ones
    All the best

    1. hemantjere123@gmail.com Avatar

      Thanks Meenakshi for you comments.Will await future comments also. Please also inform all your friends who are interested in reading.

  11. Meenakshi Wani Avatar
    Meenakshi Wani

    Sorry it’s surwat

  12. Pranit Kurdukar Avatar
    Pranit Kurdukar

    Great Initiative. 👍

  13. Pankaj Apte Avatar
    Pankaj Apte

    Dear Hemant,
    Appreciate you taking the step to pen down or rather key in your feelings & thoughts, which come to one’s mind off & on, funny, naughty or any other wise.
    Your this attempt was a nice, spicy read and looking forward to the reflection of your wisdom one way or another, every so often.
    Warmest regards,
    Pankaj.

    1. hemantjere123@gmail.com Avatar

      Dear Pankaj,
      Thanks a lot. I was sure you’ll read and give your feedback.
      Please inform your other friends, who maybe interested in reading.
      I am planning to post both Marathi and English stuff.

  14. Mahesh Bhagwat Avatar
    Mahesh Bhagwat

    Your comment is awaiting moderation.

    जेरीस आणण्यासाठी तरी लिहित जा. व्यक्त होण्याची ही अभिनव शैली नक्कीच प्रशंसनीय आहे. व्यक्त होताना कालानुरूप बदल नेहमीच अपेक्षित असतात. तू तर सिद्धहस्त लेखक आहेस. लेखन ही कला आहे की कृती हा विषय वादग्रस्त असला तरी तुझे प्रत्येक लेखन ही उत्कृष्ट कलाकृती ठरावी ही माता सरस्वतीकडे मनःपूर्वक प्रार्थना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *