म्याव 

आमच्या घरात तीन मांजरी आहेत. आता व्याकरणाप्रमाणे तीन मांजरं म्हणायला पाहिजे कारण त्यातला एक बोका आहे. पण बायकांना लहान मुलाचे पण मुलीप्रमाणे लाड करायची सवय असते. त्याप्रमाणे आमच्या बोक्याचंही मांजर झालंय. 

Officially on paper (खरं तर असं काही नाहीये, उगीच म्हणायचं) तर या तिघांची नावे Blaze, पिंगू आणि चिंटू आहेत. यातला Blaze बोका आहे, सर्वात मोठा. वयाने आणि आकाराने, आणि अत्यंत आळशी आहे – माझ्यासारखाच. गंमत म्हणजे सर्वात मोठा असून तो सर्वात कमी खातो. (नाही ना, इथे माझी बरोबरीच होऊ शकत नाही.) सर्वात वयाने लहान असलेली-ला, चिंटू – सर्वात जास्त खाते आणि अगदी खादाड आहे. (तुलनेचा मोह आवरतो).

नेहमीप्रमाणे विषयांतर करून सांगतो. चिंटू हे मुलाचं नाव,  हे वाडेकर आणि पंडितानी इतके ठसवलंय की पुण्यात तरी कुणी हे मुलीला टोपणनाव म्हणून वापरणार नाही असं वाटतं. 

विषयांतराच्या विषया विषयी (३ वेळा एकच शब्द आला) सांगतो. आम्ही टेकडीवर फिरायला जातो, तेव्हा गप्पांमध्ये एकातून दुसरा असे इतके विषय निघतात की नक्की सुरुवात कुठे केली होती ते कुणाच्या बापालाही आठवत नाही. डेविड धवन च्या comedy पेक्षा complex. 

पुन्हा मांजरीकडे येतो. ५ वर्षांपूर्वीपर्यंत आमच्या घरी कोणताही पाळीव प्राणी नव्हता. एकदा aquarium चा प्रयत्न करून पाहिला. पण शांत वाटण्याऐवजी कंटाळाच आला. कुत्र्यांची भीती आणि आवड दोन्ही होती.  मांजरीबद्दल मात्र खरं सांगायचं तर थोडा राग होता. कारण परत ‘पिते दूध डोळे मिटूनी…’ हेच लक्षात. कुत्रा, घोडा कसे इमानदार असतात. हेच डोक्यात. अगदी पार धर्मराजाचा  कुत्रा, राणा प्रतापचा चेतक आणि शिवाजी महाराजांचा वाघ्या हेच आदर्श. 

पण या मांजरी घरी आल्या आणि आमचे सगळे आदर्श बदलले. ५ वर्षांपूर्वी माझी मुलगी पियुषा कार खाली अडकून पडलेल्या एका पिल्लाला घरी घेऊन आली. माझ्या पत्नीने आणि मोठ्या मुलीने विरोध करायचा प्रयत्न केला पण तिनं तो सहजपणे हाणून पाडला. 

बोका ५ वर्षांपूर्वी आला, पिंगू ४ वर्षांपूर्वी आणि चिंटू १ वर्षांपूर्वी. महत्वाचं म्हणजे यांचं कुणाचंही एकमेकांशी  रक्ताचं नातं नाही. 

अमेरिकेत जसे ब्रिटिश, जर्मन, डच वगैरे पहिले, आफ्रिकेतले काळे गुलाम नंतर,  इटालियन वगैरे त्यानंतर, नंतर मेक्सिकन, चिनी, जपानी आणि सगळ्यात शेवटी भारतीय आले. सगळे इमिग्रंटच. पण हे गोरे, अमेरिका आपल्याच जन्मदात्याची असे समजून आशियाई लोकांवर गुरकावतात तसे Blaze आणि पिंगू, चिंटूवर अधूनमधून गुरकावतात. नशीब या गोऱ्यांनी, तिथल्या खऱ्या अमेरिकन रहिवाशांना जसे ‘इंडियन’ म्हणून जवळपास संपवून टाकले तसं आमच्याबाबतीत या मांजरांनी केलं नाही, अर्थात ही सगळी मांजर सूज्ञ आहेत. कारण असं केलं तर त्यांच्या खाण्याचे वांदे होतील, हे त्यांना माहित आहे. 

पण खरं सांगू – ही तिन्ही मांजरं खूप प्रेमळ आहेत. रोज सकाळी बोका पायाला घासत घुटमळतो. हेच काम संध्याकाळी पिंगू करतो. रविवारी दुपारी मी कधी झोपलो तर चिंटू पांघरुणात शिरतो. त्यांच्या या फक्त्त अशा वागण्याने आपला स्ट्रेस निम्मा होतो. प्राजक्ता तर त्यांची प्रेमळ आज्जी आहे. भूक लागली की ओरडत तिच्या भोवती ते फिरत राहतात. तरी  खायला मिळालं की लगेच खातील याचा भरवसा नसतो. लाडावलेल्या नातवंडा पेक्षा त्यांचा हट्ट कमी नसतो. त्यांचा चॉईस बदलत राहतो. त्यामुळे आमच्या घरात खाण्यापिण्यात सर्वात जास्त चैन त्यांची होते. पण एक आहे, त्यातला एकही ‘म्याव’ असा आवाज काढत नाही. वेगळेच आवाज काढतात जे शब्दात मांडणं शक्य नाही. 

पियुषा तर या तिघांची आईच आहे. नुसते लाड नाही तर त्यांना शिस्त लावणे, वेगवेगळे खेळ शिकवणे, त्यांना vet कडे नेऊन आणणे, औषधे देणे, अशी सगळी कामं ती अगदी प्रेमाने करत असते. या बाबतीत ऋत्विकही तिच्या बरोबर असतो. या शिस्तीमुळेच काय, ही मांजरं घरात खेळून वस्तू इकडे तिकडे करतात, पण कचरा करत नाहीत. ऋतुजाची प्राण्यांची भीती या मांजरांनी घालवली.

तुम्ही जर you tube वर मांजरांविषयी सर्च केलं तर तुम्हांला वाटेल की मांजरं डायरेक्ट देवदूतच आहेत. त्यांना अंधारात दिसतं. (त्यांना खूप कमी प्रकाश पुरतो, हे खरं आहे.) माणसाला दिसत नाहीत अशा अनेक गोष्टी त्यांना दिसतात, आपल्याला ऐकू येत नाहीत असे आवाज ऐकू येतात, आपला ऑरा दिसतो, अनेक गोष्टी.  यातल्या खऱ्या किती आणि ताणलेल्या किती हे माहित नाही. 

तुम्हांला मी जेरीस आणीन पण वीट आणणार नाही. मला माहितीय, ज्या लोकांकडे पेटस नसतात, त्यांना हे पेट पुराण ऐकताना, बायकांची आपल्या मुलांचे गुण,  आपल्या नवऱ्याचे अवगुण आणि सासूच्या हॉरर स्टोरीज सांगण्याची जी अहमहमिका लागते, त्याचीच  आठवण येणार.

पण तरीही – जसं एकदा सगळं करून बघावं,तसं मांजर ही पाळून बघावं. खर्चाचं मी बोलत  नाही. पण ज्या प्रकारच्या विअर्ड वस्तू आणि खाद्यपदार्थ आमच्या घरी येत असतात, त्यावरून एक कळतं, काय? जाऊ दे….

जाता जाता एकच सांगतो,

They say, Every Dog owns the Owner

I say Every Cat owns at least 4 Owners.

37 responses to “म्याव ”

  1. दत्ता वायचळ Avatar
    दत्ता वायचळ

    वा वा वा छान आहे

    1. Hemant Jere Avatar

      Thanks a lot Datta.

  2. Vinayak Mahamuni Avatar
    Vinayak Mahamuni

    तुमचा मार्जार प्रेमाचा लेख भावला. आम्ही पण घरात एक बोका पाळला आहे. घरात सर्वांसाठी ते आकर्षण आहे. मी तुमच्या मताशी २०० टक्के सहमत आहे.

    1. Hemant Jere Avatar

      Thanks a lot Vinayak! Please read other blogs too and give your feedback. I plan to post every Sunday

  3. Sunil Gaidhani Avatar
    Sunil Gaidhani

    Mast.i have male cat.so I feel happy.

  4. Sagar Vishe Avatar
    Sagar Vishe

    जेरे साहेब, तुमच्या पुस्तक प्रकाशना नंतर खूप वर्षांनी तुमच्या कडून पुन्हा काही वाचायची पर्वणी आली.
    ज्योतीला मांजराचं विशेष प्रेम आहे. तिला तुमचा लेख वाचायला दिला.
    तुमच्या म्याव ला आमचा वाव 👍

    1. Hemant Jere Avatar

      धन्यवाद सागर, इतरही ब्लाग वाचून लिहावे.

  5. Sunil Gaidhani Avatar
    Sunil Gaidhani

    I HAVE MALE CAT.ITS NAME IS GUNDA.I Feel happy.

  6. Deepa Panse Avatar
    Deepa Panse

    खूप छान लिहिलंय. माझी पण भिती तुमच्या घरी येऊन कमी झाली

    1. Hemant Jere Avatar

      दीपा धन्यवाद. अशीच येत रहा, भीती पार पळून जाईल

  7. Ajay Joshi Avatar
    Ajay Joshi

    Good that you have Mau

    1. Hemant Jere Avatar

      Thanks a lot Ajay!

  8. Ajey Limaye Avatar
    Ajey Limaye

    छान !!! मी सुद्धा मांजर ( बोका ) पाळला आहे. मला मांजर म्हटलं की नको वाटायचं पण आता मी त्याच्या वर प्रेम करायला लागलो आहे. विचित्र आवाज म्हणजे रात्र भर झोपू देत नाही. ALL BEST FOR NEW VENTURE !!!

    1. Hemant Jere Avatar

      Thanks a lot Ajeya!

  9. Ratan Oswal Avatar
    Ratan Oswal

    Have you given injections to All Cats.
    To prevent Rabbies.

    1. Hemant Jere Avatar

      Yes, sure Ratan, thanks for your concern

  10. Gurudatta Santi Avatar
    Gurudatta Santi

    अतिशय छान ब्लॉग. शब्द एकदम परफेक्ट वापरले आहेस. उत्कृष्ट आणि खुसखुशीत…. मस्त.
    अजून येऊ द्यात पुढचे ब्लॉग्स.
    लिहिते व्हा हेमंत!!

    1. Hemant Jere Avatar

      Thanks a lot Gurudatta!

  11. Satish Ranade Avatar
    Satish Ranade

    छान लिहिलं आहेस जेरे… Actually it’s very difficult task to have Pets in the home.. All the Best.

    1. Hemant Jere Avatar

      Thanks a lot Satish. Please read other blogs also and give feedback. So far there are 5 and I plan to post 1 every Sunday.

  12. Prajakta Jere Avatar
    Prajakta Jere

    मी आणि माझं पेट पुराण. न संपणारी गोष्ट….

    1. Hemant Jere Avatar

      पेट पुराण नाही, पुरण, आनंदी राहण्याकरता

  13. Smita N Kulkarni Avatar
    Smita N Kulkarni

    Very well written! I am an animal lover though I do not have a pet.
    Expecting more such blogs.

    1. Hemant Jere Avatar

      Thanks Smita. Please read other blogs too and give your feedback. Tell your daughter also and also tell Sneha. So far there are 5 blogs. I plan to release 1 every Sunday.

  14. Sangeeta Maniyar Avatar
    Sangeeta Maniyar

    Amazing Hemant
    Liked your wordings
    All the best for your future write ups 😬

    1. Hemant Jere Avatar

      Thanks a lot Sangeeta. Can you please read other blogs too and give your feedback? So far I have posted 6 blogs, 2 in English, 4 in Marathi and I plan to post 1 new each Sunday.

  15. Nihar Avatar
    Nihar

    लेख अगदी जमून आला आहे. छानच! 👍🏻

    1. Hemant Jere Avatar

      धन्यवाद निहार सर. बाकीचेही ब्लॉग वाचून अभिप्राय द्याल का?

  16. Chitra Shringarputale Avatar
    Chitra Shringarputale

    वाह! खूप छान लिहिलं आहे.आम्ही बघतो पियुषा चीं धड़पकड़, एकदा एक मांजर आमच्या वरच्या मजल्या च्या खिड़की वर जाउन बसलं आणी ख़ाली उतरता येइना तेंव्हा पियुषा व प्राजक्ता दोघी ही किती हवालदिल झाल्या होत्या ते ख़ाली येई पर्यंत हे आम्ही बघीतलेलं आहे. वाचताना तो प्रसंग आठवावा ह्यतच किती छान लिहीलं आहे हे दडलयं 😃

    1. Hemant Jere Avatar

      धन्यवाद. खरं आहे. अशा अनेक प्रसंगांचे तुम्ही दोघे साक्षीदार आहात.

  17. Vaishali Pawar Avatar
    Vaishali Pawar

    Totally agreed 👍. सगळे जर असेच प्राण्यांवर प्रेम करू लागले तर जगच बदलून जाईल

    1. Hemant Jere Avatar

      धन्यवाद वैशाली. इतरही ब्लॉग वाचून अभिप्राय दिलास तर छान वाटेल

  18. Swapna Joshi Avatar
    Swapna Joshi

    मुक्या प्राण्यांचा लळा खरच निरपेक्ष असतो. मनीमाउ अगदी गोड आहेत

    1. Hemant Jere Avatar

      खरंच stress-buster आहेत

  19. Anjali Mulay Avatar
    Anjali Mulay

    मला कायमच तुमच्या सर्वांच्या मार्जार प्रेमाचे कुतूहल वाटत असते. त्याची थोडी झलक मिळाली यातून.

    छान लिहिले आहेस हेमंत

    1. Hemant Jere Avatar

      धन्यवाद अंजू. मांजरांच्या बाबतीत आमचा प्रवास पार नफरत से मोहोब्बत तक असा झालाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *